न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू (दि. ३ जून २०२६) :- संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील वाढती वाहतूककोंडी आणि वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर देहू ते देहूरोड दरम्यानचा पालखी मार्ग चौपदरी करण्याची मागणी चिंचोली ग्रामस्थांनी केली आहे.
यासोबतच देहूरोड येथील मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपूल उभारण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात आमदार सुनील शेळके आणि अप्पर तहसीलदार जयराज देशमुख यांना निवेदन देण्यात आले. तळवडे आयटी पार्क, एमआयडीसी परिसरातील कर्मचारी, कामगार तसेच राज्यभरातून येणाऱ्या भाविकांची मोठी वर्दळ या मार्गावर असते. त्यामुळे वाहतूक सुरळीत करण्यासाठी चौपदरीकरण आणि उड्डाणपूल तातडीने उभारावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.















