- मोरवाडी व नेहरूनगर न्यायालयात न्यायाधीशांचा सत्कार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०८ जून २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहरातील मोरवाडी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात नव्याने रुजू झालेले दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर माननीय कुलकर्णी साहेब यांचे पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशनच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. गौरव वाळुंज, उपाध्यक्ष अॅड. अनिल पवार, सहसचिव अॅड. अनिल शिंदे तसेच सदस्य अॅड. मंगेश खराबे उपस्थित होते. यावेळी न्यायव्यवस्थेतील त्यांच्या नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
तसेच नेहरूनगर न्यायालयात नव्याने रुजू झालेले प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी (JMFC-CJJD) माननीय शेरेकर साहेब व माननीय इनामदार साहेब यांचेही बार असोसिएशनच्या वतीने यथोचित स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमास बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड. वाघमारे, ज्येष्ठ अॅड. माने तसेच इतर मान्यवर अधिवक्ते उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी न्यायव्यवस्था ही समाजाच्या विश्वासाचा आधारस्तंभ असल्याचे सांगत न्यायाधीशांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. नव्याने रुजू झालेल्या न्यायाधीशांच्या कार्यातून न्यायनिष्ठा, निःपक्षपातीपणा, संवेदनशीलता आणि जनहित यांचा आदर्श संगम अनुभवास यावा तसेच त्यांच्या कार्यामुळे न्यायव्यवस्थेचा गौरव अधिक वृद्धिंगत व्हावा, अशी भावना व्यक्त करण्यात आली.















