न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०८ जून २०२६) :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यपूर्तीनिमित्त मंगळवारी (दि. ९ जून) पुण्यात भव्य ‘नरसिंह महायज्ञ’ आयोजित करण्यात आला आहे. राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने हा धार्मिक व सामाजिक उपक्रम श्रीकृष्ण मंदिर, इस्कॉन, कात्रज येथे दुपारी ३.३० वाजता होणार आहे.
पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत अमर साबळे यांनी मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने विकासाच्या नव्या पर्वात प्रवेश केल्याचे सांगितले. विकसित भारत २०४७ या संकल्पनेला आध्यात्मिक बळ मिळावे, तसेच राष्ट्राच्या प्रगतीसाठी सामूहिक प्रार्थना व्हावी, या उद्देशाने महायज्ञाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
या महायज्ञात अनेक दाम्पत्ये लक्ष्मीनारायण स्वरूपात सहभागी होऊन राष्ट्रकल्याणाचा संकल्प करणार आहेत.
पत्रकार परिषदेला भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, सदाशिव खाडे, माऊली थोरात, ॲड. मोरेश्वर शेडगे आणि विजय शिनकर उपस्थित होते.














