न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०७ ऑगस्ट २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार संघाच्या वतीने संघाच्या पत्रकार सदस्यांना उच्च दर्जाच्या रेनकोटचे वाटप करण्यात आले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील पत्रकार कक्षात झालेल्या कार्यक्रमात स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या हस्ते रेनकोटचे वितरण करण्यात आले.
यावेळी अखिल मराठी पत्रकार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे, शहराध्यक्षा सायली कुलकर्णी तसेच संघटनेचे पदाधिकारी आणि पत्रकार सदस्य उपस्थित होते.
यावेळी बापूसाहेब गोरे म्हणाले, पत्रकारांना उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा अशा सर्व ऋतूंमध्ये प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन बातमीदारी करावी लागते. कोणत्याही परिस्थितीत आपले कर्तव्य बजावणाऱ्या पत्रकारांना पावसाळ्यात संरक्षण मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार संघ पत्रकारांना विविध सुविधा व सवलती मिळाव्यात यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून, भविष्यातही अशा कल्याणकारी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.


















