न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २४ सप्टेंबर २०२६) :- अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच २५ सप्टेंबर २०२६ रोजी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात गणेश विसर्जन होणार आहे. यंदा शहरातील १,३९८ सार्वजनिक गणपती मंडळांच्या विसर्जन मिरवणुका निघणार असून, ६८,९९६ घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात येणार आहे.
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बंदोबस्तासाठी २ अपर पोलीस आयुक्त, ८ पोलीस उपायुक्त, १६ सहाय्यक पोलीस आयुक्त, ७४ पोलीस निरीक्षक, २९० सपोनि/पोउनि, २,७८० पोलीस अंमलदार, ६ आरसीपी, ६०२ होमगार्ड, एम.आर.पी.एफ.च्या २ प्लाटून तसेच १६६ वॉर्डन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गणेश विसर्जनाच्या मिरवणुका आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांकडून विविध ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला असून, गणेशोत्सव शांततेत आणि मंगलमय वातावरणात पार पडावा, यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे सांगण्यात आले आहे.


















