- ‘मिशन पर्यावरण’ बालचित्रपटाच्या लेखनाची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद..
- लेखिका प्रियांका खेडकर यांचा ‘IBR Achiever’ म्हणून सन्मान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३१ ऑक्टोबर २०२६) :- मोशी येथील लेखिका प्रियांका मयूर खेडकर आणि दिग्दर्शक मयूर खेडकर यांच्या ‘Mission Paryavaran’ या शैक्षणिक बालचित्रपटाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या चित्रपटाला केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे (CBFC) ‘U’ प्रमाणपत्र मिळाले असून, चित्रपटाच्या लेखनाची ‘India Book of Records’मध्ये नोंद झाली आहे.
या कामगिरीबद्दल लेखिका प्रियांका खेडकर यांना ‘IBR Achiever’ म्हणून सन्मानित करण्यात आले.
आधुनिक डिजिटल आणि व्हिज्युअल माध्यमांचा वापर करून तयार करण्यात आलेल्या या चित्रपटातून बालकांमध्ये पर्यावरण संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या यशामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातून खेडकर दाम्पत्याचे अभिनंदन होत आहे.


















