न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जून २०१९) :- पालकमंत्री शहरात प्रथमच आले. त्यांचे स्वागत करण्यासाठी आयुक्त साहेब तुम्ही स्वतः तेथे होता. आम्हाला मात्र हे स्पष्टीकरण मान्य नसून, पालकमंत्री काय यानंतर शहरात आले नसते काय? किंवा आपणही प्रशासकीय संकेत पाळून त्यांची भेट घेऊन सत्कार करु शकला नसता काय?
आपल्या पदाची मर्यादा सोडून आपल्याला भाजप पक्ष कार्यालयात जाण्याची गरज का पडली? याचा खुलासा आपण जनतेसमोर करावा, अन्यथा आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भारीप बहुजन महासंघाचे पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.











