न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २९ जून २०१९) :- पुण्यातील कोंढव्यामध्ये सोमजी पेट्रोल पंपाजवळ असलेल्या इमारतीच्या कंपाउंडची भिंत शेजारी बांधकाम मजुरांसाठी तात्पुरत्या स्वरूपात बांधलेल्या पत्र्याच्या खोल्यांवर कोसळली
कामगारांच्या खोल्या खड्ड्यात असल्याने मोठ्या प्रमाणात भिंतीचा ढिगारा पडला. त्याचप्रमाणे पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कार देखील या घरांवर कोसळल्या. भिंत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला.
मृतांमध्ये चार लहान मुलांचा समावेश आहे. ही घटना शुक्रवारी (दि. २८) रोजी मध्यरात्री घडली. यात आलोक शर्मा वय २८ वर्षे, मोहन शर्मा वय २० वर्षे, अजय शर्मा-वय १९, अभंग शर्मा-वय १९, रवी शर्मा – वय १९, लक्ष्मीकांत सहानी -वय ३३, अवधेत सिंह -वय ३२, सुनील सिंग -वय ३५, ओवी दास -वय ६ वर्षे सोनाली दास -वय २ वर्षे, विमा दास -वय २८, संगीता देवी -वय २६ अशी मृतांची नावे आहेत.











