न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९. जुलै. २०२०) :- श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिकृती कश्मीर येथील लष्करातील बटालियन ६ च्या सैनिकांनी स्थापन केली आहे. गुरेंज सेक्टर कांजलवान येथे गावात या मूर्तीची प्रतिस्थापना केली आहे.
याबाबत ६ मराठा बटालियनचे प्रमुख कर्नल विनोद पाटील यांनी दगडूशेठ गणपती ट्रस्टला पत्र लिहून गणपती प्रतिष्ठपणेची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार ट्रस्टने त्यांच्या विनंतीला मान देत गणपतीची मुर्ती रेल्वेने जम्मू काश्मीर अडीच फूट उंचीची मूर्ती येथे पाठवली.
कांजलवान येथे मंदिराच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून या मंदिराच्या उभारणीत सर्व सैनिकांचा सहभाग असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले. यावेळी जम्मू काश्मीरमध्ये गणपतीच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.











