- शहरातील नऊ जणांचा आज कोरोनाने केला घात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९. जुलै. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज गुरुवारी (दि. ०९ जुलै) रोजी ५६८ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. आज विठ्ठलवाडी (पुरुष, वय ६७ वर्ष), चिंचवड ( स्त्री, वय -४८ वर्ष), काळेवाडी ( स्त्री, वय ५० वर्ष), आकुर्डी (पुरुष, वय ६३ वर्ष), रहाटणी (पुरुष, वय ६२ वर्ष), गांधीनगर ( स्त्री, वय ३८ वर्ष), पिंपरी (पुरुष, वय ५१, वर्ष), पिंपरी (पुरुष, वय ५१ वर्ष), आकुर्डी (पुरुष, वय ७० वर्ष), इन्दुरी (पुरुष, वय ६५ वर्ष), पुणे (स्त्री, वय ६५ वर्ष) येथील अकरा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ६०६१ वर पोहोचली आहे. महापालिका रुग्णालयात २२६५ रुग्ण उपचार घेत असून, महापालिका हद्दीतील रहिवाशी परंतु, इतर ठिकाणी उपचार घेत असणाऱ्या रुग्णांची संख्या १५ वर पोहोचली आहे. तर, आजपर्यंत शहरातील एकूण ८६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ३६८१ वर पोहोचली आहे. आज पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.











