न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जुलै. २०२०) :- मोशी येथील कचरा डेपोत गुरुवारी रात्री मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. कचरा डेपोत हा मृतदेह कसा आला, यासह अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मोशी येथे कचरा डेपो आहे. शहरातील कचरा संकलित करुन या डेपोत आणला जातो. दरम्यान, या डेपोत जेसीबीच्या सहाय्याने कचऱ्याचे विलगिकरण करण्याचे काम सुरु होते. त्यावेळी जेसीबी चालकाला कचऱ्यामध्ये मृतदेह असल्याचे दिसून आले.
याची माहिती त्वरीत भोसरी एमआयडीसी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी हा मृतदेह वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. मृतदेहाची उशिरापर्यंत ओळख पटलेली नव्हती. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.











