न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६. जुलै. २०२०) :- आजपर्यंतची मोठी कारवाई करण्यास पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या युनिट ४ ला यश आले आहे. ही कारवाई आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. या कारवाईत पोलिसांनी १५ आरोपींना अटक केली आहे तर ४२ पिस्तुल व ६६ जिवंत काडतुसे जप्त केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागील आठवड्यात पिंपरी चिंचवडमधील सांगवी येथून एका इसमाला अवैध हत्यार बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्याच्या तपासात माहिती समोर आली की अश्याच प्रकारचे मोठे रॅकेट शहरात सक्रिय आहे, जे मध्यप्रदेशमधून बनावटी पिस्तुल महाराष्ट्रात तसेच पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात आणले जाते. पोलिसांनी याचे गांभीर्य पाहता तत्काळ काही पथके तयार केले. तपासादरम्यान पोलिसांचे एक पथक मध्यप्रदेशमध्ये जाऊन काही दिवस तेथे वेषांतर करून राहिले व आरोपींची संपूर्ण माहिती घेतली. या काळात लॉकडाऊन लागू झाल्याने पोलिसांना मोठी अडचण देखील निर्माण झाली होती. परंतु, तरी देखील वेषांतर करून मिळालेल्या माहिती नुसार पोलिसांना मुख्य आरोपीला मध्य प्रदेश मधून अटक करण्यात यश आले तर पुढील तपासात पुणे व आसपासच्या भागातून पोलिसांनी इतर आरोपीना अटक केली आहे.
ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई,अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे,पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ,सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील,यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ४ चे वरिष्ट पोलीस निरीक्षक मोहन शिंदे,सहायक पोलिस निरीक्षक अंबरीश देशमुख,पो.ह.प्रवीण दळे, नारायण जाधव,संजय गवारे,धर्मराज आवटे,दादाभाऊ पवार,आदिनाथ मिसाळ,पो.नाईक.संतोष असवले,तुषार शेटे,लक्ष्मण आढारी, गौस नदाफ,वासुदेव मुंडे,शावरसिद्ध पांढरे,प्रशांत सैद,सुनील गुट्टे,तुषार काळे,सुरेश जायभाये, अजिनाथ ओंबासे, धनाजी शिंदे,सुखदेव गावंडे, नागेश माळी,राजेंद्र शेटे यांच्या पथकाने केले आहे.