न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६. जुलै. २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कोरोना कोविड १९ संसर्गाचा प्रतिबंध करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनाची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यानी घेतली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या कोविड १९ वॉर रुमला त्यानी भेट दिली. त्यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पिपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनाची माहिती त्याना दिली.
यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयाचे कार्याधिकारी सौरभ राव, शिक्षण आयुक्त मनोज सोळके, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, प्रविण तुपे, उपायुक्त सुभाष इंगळे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीलकठ पोमण आदी उपस्थित होते.