न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४. ऑगस्ट. २०२०) :- महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील सोनपेठ नगरपरिषद जिल्हा परभणी येथील मुख्याधिकारी सोनम देशमुख या महानगरपालिका सेवेत रुजू झाल्या असून त्यांचा महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी पुस्तक भेट देवून सत्कार केला.
महानगरपालिकेत रुजू झालेल्या सोनम देशमुख यांना ब क्षेत्रीय कार्यालयातील प्रशासन अधिकारी पदाचा पदभार देण्यात आला आहे.















