न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४. ऑगस्ट. २०२०) :- सातारा जिल्ह्यातील कुख्यात वाळू तस्कर आणि इतर एकाला गुन्हे शाखा युनिट ४ च्या अधिकाऱ्यांनी अटक केली असून, त्यांच्याकडून पाच गावठी पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहेत.
सोमनाथ उर्फ सोमाभाई चव्हाण (वय- ३०) आणि संतोष चंदू राठोड (वय- २३) अशी अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर येथे दहशत निर्माण केलेला कुख्यात वाळू तस्कर सोमनाथ उर्फ सोमाभाई चव्हाण (कालगाव जि. सातारा) हा उंब्रज पोलीस ठाण्यात आर्म ऍक्टच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत सातारा मध्यवर्ती कारागृहात होता.
त्याला कारागृहातून पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलीस अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली व त्याच्याकडील चार गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसं जप्त केली आहेत.















