न्यूज पीसीएमसी नेटवर्क
वाकड (दि. ३० नोव्हें.) :- विवाहितेचा छळ करीत असतानाच ती आजारी असताना घटस्फोट घेण्यासाठी डॉक्टर असलेल्या पतीने सलाईनमधून एच. आय. व्ही. विषाणु तिच्या शरीरात सोडण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी पती व सासुसासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़
या प्रकरणी २७ वर्षीय महिलेने वाकड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार २० मे २०१५ ते फेबु्वारी २०१८ दरम्यान घडला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, पिडीत विवाहीतेचा २०१५ मध्ये उमेश याच्याशी विवाह झाला होता. त्या सासरी नांदत असताना पती, सासु व सासरे यांनी व्यवसायासाठी माहेरुन पैसे आणावे. यासाठी त्यांचा छळ केला. तिच्या वडिलांनी जावयाची ही मागणी वेळोवेळी पुरविली. तरीही त्यांची मागणी वाढत गेली. शेवटी अनिताने माहेरहून पैसे आणण्यास नकार दिल्याने त्यांना शिवीगाळ करुन त्यांच्या मानसिक व शारीरिक छळ केला व तू घटस्फोट दे म्हणून तिच्याकडे मागणी करु लागले. तिचा पती होमिओपॅथी डॉक्टर आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस़ जे़ गोडे करीत आहेत़.










