- दोन दिवसांत २९ जणांवर कारवाई..
- ११ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गांजासेवनाची प्रकरणे…
सूरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २९ ऑक्टोबर २०२६) : औद्योगिक नगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात गांजासेवनाची प्रकरणे समोर येत आहेत. २७ आणि २८ ऑक्टोबर या दोन दिवसांत शहरातील ११ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत २९ जणांविरोधात एनडीपीएस कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. आळंदीपासून चिखलीपर्यंत आणि भोसरीपासून देहूरोडपर्यंत विविध भागांत ही प्रकरणे नोंदवली गेली. त्यामुळे अंमली पदार्थांच्या सेवनावर नियंत्रण ठेवण्याचे पोलिसांसमोरील आव्हान पुन्हा चर्चेत आले आहे. ‘गांजाच्या धुरात उडतं पिंपरी-चिंचवड शहर!’ हा सवाल आता उपस्थित होत असून, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रभावी कारवाई आणि जनजागृतीची गरज आहे.
या कारवाईत आळंदी, शिरगाव, भोसरी, चाकण दक्षिण, तळेगाव दाभाडे, पिंपरी, देहूरोड, चिंचवड, बावधन, चिखली आणि दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील प्रकरणांचा समावेश आहे.
कारवाई झालेल्या व्यक्तींची एकत्रित नावे : मंगल सिंह मेहरा, आदित्य संदीप रोकडे, सुरेश विजय नायकवाडी, राजु रघुनाथ पवार, चेतन पुनमचंद घोती, ऐकम छबुलाल सिंग, विष्णुपसाद लेखाराम मल्लाह, कार्तीक लक्ष्मण आडे, समीर आरीफ आत्तार, विकी महेद्र पवार, विजय श्रीपाद बामणे, आकाश राजेश तेलगु, इरफान मगबुल शेख, ईशान राकेश बागल, प्रमोद अनिल बागवे, धनाजी अशोक तांबे, प्रेम लिबांजी रोकडे, रोहीत रमेश सुतार, मयुर परशुराम मिस्त्री, यशवंत संतोष मोरे, सुरज संतोष गाडेकर, प्रतिक बाळू चव्हाण, ऋतिक हनुमंत शिंदे, असद फारुक शेख, प्रज्वल प्रमोद रोकडे, शरद मुलचंद दुबे, अमोल अविनाश रोकडे, मोहंमद नियाज अहमद खालीद आणि राहुल मिथीलेश गोंड.
या प्रकरणांमध्ये गांजासेवनासंदर्भात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क) आणि २७ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. काही प्रकरणांत कायदेशीर नोटीस बजावण्यात आल्याने सर्व संबंधितांना अटक झाल्याचे गृहीत धरता येणार नाही. शहराच्या विविध भागांत अशा प्रकारची प्रकरणे समोर येत असल्याने अंमली पदार्थांच्या सेवनावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांची नियमित तपासणी आणि जनजागृती महत्त्वाची ठरणार आहे.


















