- ज्येष्ठ कार्यकर्ते, विधिज्ञ आणि लोकप्रतिनिधींचा समावेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २८ ऑक्टोबर २०२६) :- भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक कामकाजात शिस्त आणि अनुशासन अधिक बळकट करण्यासाठी भाजपच्या पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा अनुशासन समितीची घोषणा करण्यात आली आहे. पक्षाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी समितीतील सदस्यांची नावे जाहीर केली.
पक्ष संघटनेचे कामकाज सुरळीत चालावे, संघटनेचा योग्य विस्तार व्हावा तसेच निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांनी खोट्या बातम्या आणि दिशाभूल करणाऱ्या प्रचाराला बळी न पडता पक्षाचे काम जोमाने करावे, या उद्देशाने समिती स्थापन करण्यात आली आहे. पक्षांतर्गत शिस्त आणि अनुशासन ही भारतीय जनता पार्टीची ओळख असून ती अधिक बळकट करण्यावर भर देण्यात येणार आहे.
या समितीमध्ये पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, ज्येष्ठ विधिज्ञ, लोकप्रतिनिधी तसेच पक्ष संघटनेत दीर्घकाळ काम करण्याचा अनुभव असलेल्या कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला आहे.
अनुशासन समितीचे सदस्य पुढीलप्रमाणे :-
१. सदाशिव दादासाहेब खाडे
२. आमदार उमा गिरीश खापरे
३. ॲड. मोरेश्वर ज्ञानेश्वर शेडगे
४. ॲड. गोरखनाथ गेनबा झोळ
५. प्रशांत कृष्णराव शितोळे
६. विकास हरिश्चंद्र डोळस
पक्ष संघटना अधिक मजबूत करणे, कार्यकर्त्यांमध्ये शिस्त आणि अनुशासन राखणे तसेच संघटनात्मक कामकाजाला योग्य दिशा देणे, या उद्देशाने या समितीची स्थापना करण्यात आली आहे. भाजपच्या पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा संघटनेच्या वतीने ही घोषणा करण्यात आली आहे.

















