न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० ऑक्टोबर २०२०) :- काळेवाडी येथील एका बँकेसमोरील पत्राशेडमध्ये मटका खेळत असलेल्या व्यक्तीसह चालकावर वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
सामाजिक सुरक्षा पथकाने १७ ऑक्टोबरला दुपारी सव्वातीनच्या सुमारास छापा टाकला. मटकाचालक संदीप किसन तरडे (वय ३८, रा. मातोश्री निवास, शिवशंभो कॉलनी, रहाटणी) यांच्यासह दहा आणि इतर सात अशा १७ व्यक्तीविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्याकडून ४७ हजार १४० रुपयांची रोकड जप्त केली आहे.


















