- निवडणूक कार्यक्रम जाहीर….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० ऑक्टोबर २०२०) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उपमहापौर तुषार हिंगे यांनी बुधवारी आपल्या पदाचा अचानक राजीनामा दिला. महापौर उषा ढोरे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला होता. महापौर ढोरे यांनी त्यांचा राजीनामा मंजूर करून पुढील कारवाईसाठी पाठविला होता.
दरम्यान उपमहापौरपदासाठी ६ नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे. दुपारी तीन ते पाच या वेळेत अर्ज दाखल करायचे आहेत. याबाबतची माहिती महापालिकेचे नगरसचिव उल्हास जगताप यांनी दिली. त्यामुळे पुढील उपमहापौर पद कोणाला मिळते याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
महापालिकेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी अकरा वाजता विशेष सभेत ही निवडणूक प्रक्रिया होणार आहे. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत.