- हातात काठ्या व कोयता हवेत फिरवुन गुन्हेगारांची दुचाकी रॅली चर्चेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ मे २०२४) :- दुचाकीवरून रॅली काढली. हातात लाठ्या काठ्या व कोयते घेवुन हॉर्न वाजवुन रस्त्याने जाणारे येणारे लोकांना व लोकवस्ती मधील लोकांना शिवीगाळ करीत रस्त्यातुन बाजुला होण्यासाठी सांगुन अरेरावीची भाषा वापरली.
“हमारा भाई जेल से छुट गया, अभी हम दुश्मन को देख लेंगे” अशी घोषणाबाजी करुन हातातील काठ्या व कोयता हवेत फिरवुन दहशत निर्माण केली. त्यामुळे आजुबाजुचे लोक त्यांच्या भितीने सैरावैरा इकडे तिकडे पळु लागले, असं फिर्यादीत म्हंटल आहे. हा प्रकार (दि.०३) रोजी ९.५० वा. इंदिरानगर, चिंचवड येथील सार्वजनिक रोडवर घडला.
पोलिसांनी १) आकाश गणपत चव्हाण वय-२७ वर्ष, रा.चाळ नं.३ इंदिरानगर चिंचवड पुणे, २) आकाश ऊर्फ काकडी सुरेश दांगडे वय-२७ वर्ष, रा. आशिष किराणा दुकानापाठीमागे, चाळ नं.३० इंदिरानगर चिंचवड ३) करण ऊर्फ छोटु अनिल धोत्रे वय-२२ वर्ष, रा.चाळ नं.५ इंदिरानगर ४) राहुल ऊर्फ काळया नागनाथ कु-हाडे वय-२५ वर्ष, रा.चाळ नं. १४१ इंदिरानगर ५) सतीष ऊर्फ बांगो बाळु दांगडे वय-२८ वर्ष, रा. इंदिरानगर ६) रूषीकेश गेमु राठोड वय-२३ वर्ष, रा.चाळ नं. ३ इंदिरानगर, ७) महेश ऊर्फ मामु राजु विटकर वय-२३ वर्ष, रा.साईबाबा मंदिराजवळ इंदिरानगर चिंचवड, ८) अक्षय नेताजी मोरे वय-२८ वर्ष, रा. चाळ नं.५ इंदिरानगर, ९) आकाश मंगळु राठोड वय अंदाजे २८ वर्ष, रा. इंदिरानगर १०) उमेश धर्मा राठोड वय अंदाजे २८ वर्ष, ११) राजेश भगवान पवार वय अंदाजे २९ वर्ष, १२) महेश मलकाप्पा पुजारी वय अंदाजे २८ वर्ष, रा.इंदिरानगर कमानी जवळ इंदिरानगर चिंचवड १३) तुषार बाळु मांजाळकर वय अंदाजे ३० वर्ष, रा. इंदिरानगर चिंचवड यांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात ४१३/२०२४, भादवि कलम २७९,३४१,५०४,५०६,१४३,१४७,१४९ भारतीय हत्यार कायदा १९५९ कलम ४,२५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५, मोटार वाहन कायदा कलम- १८४,११९/११७ क्रिमीनल लॉ अमेंडमेंट कलम ३,७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आरोपी क्रं १ ते ८ अटक आहेत. अतुल शेटे सहा पोलीस निरीक्षक तपास करीत आहेत.