- स्विकृत सदस्य दिनेश यादव यांची पालिकेकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ डिसेंबर २०२०) :- कुदळवाडी चिखली भागात मोकाट कुत्र्यांचा मुक्त संचार वाढला असून त्यामुळे नागरिकांना घरातून बाहेर पडणे मुश्किलीने झाले आहे.या मोकाट कुत्र्यांचा आवरण्याची आणि कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी मनपा स्विकृत सदस्य दिनेश यादव यांनी निवेदनाद्वारे मनपा पशुवैद्यकीय विभाग यांच्याकडे केली आहे.
दरदिवशी कामाला जाणारा कामगार महिला,पुरुषवर्ग आणि अन्य नागरिक यांना कामाला जाताना या कुत्र्यांचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.लहान मुलांचे घराबाहेर पडणे जिकिरीचे बनले आहे आणि प्रशासनाकडे कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची यंत्रणा कुचकामी ठरली आहे.कुदळवाडी परिसरातील वेगवेगळ्या भागातून कुत्र्यांचा त्रास असल्याच्या तक्रारी नित्याने येतात तसेच कित्तेक ठिकाणी कुत्र्याने चावा घेतल्याने गंभीर दुखापत झाल्याचे नागरिक सांगतात पण प्रशासन याबाबत उदासीन असल्याचे दिसत आहे.
प्रकृती मध्ये मानव आणि सर्व प्राण्यांना जगण्याचा हक्क आहे. पण, नागरिकांना आपल्या जीवाचे मोलदेखील आहे, याचे भान ठेऊन मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, असे यादव यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.
चिखलीत मोकाट जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे अनेक समस्या बरोबर वाहतुक, परिसर स्वच्छता देखील धोक्यात आली आहे. नेमके अशी मोकाट जनावरे कुटून येतात, कुणाची आहेत या बाबत देखील शोध घेणे गरजेचे आहे.
– दिनेश यादव, प्रभाग स्विकृत सदस्य…