- पद्मश्री किताब जाहीर झाल्याबद्दल महापौर माई ढोरेंकडून अभिनंदन…!
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जानेवारी २०२१) :- प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला, सोमवारी केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कारांची घोषणा केली. महाराष्ट्रातील सहा जणांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. गिरीश प्रभुणे यांना सामाजिक कार्यातील कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला.
गिरीश प्रभुणे यांना भारत सरकारचा पद्मश्री किताब जाहीर झाल्याबद्दल त्यांचे महापौर माई ढोरे यांनी अभिनंदन केले. यावेळी आमदार महेश लांडगे, माजी खासदार अमर साबळे, पक्षनेते नामदेव ढाके व इतर उपस्थित होते.
‘पद्मश्री’ पुरस्कार मिळणे अनपेक्षितच आहे. उपेक्षित, वंचित वर्गासाठी केलेल्या कामासाठी हा पुरस्कार आहे. पारधी, भटक्या विमुक्तांच्या व्यथा, वेदना समजल्या, त्यावर काही उपाययोजना करू शकलो, अशी प्रतिक्रिया यावेळी गिरीश प्रभुणे यांनी दिली.