न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मार्च २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज रविवारी (दि. २८ मार्च) रोजी २२७५ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १२८६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०८ पुरुष – पिपरी (७७, ६० वर्षे), थेरगाव (७८ वर्षे), वाकड (८१ वर्ष), भोसरी (६८ वर्षे), चिंचवड (८४ वर्षे), पिंपळे निलख (५९ वर्ष), चिखली (६४ वर्ष), ०४ स्त्री – पिंपरी (६० वर्षे), आकुर्डी (८५, ७१ वर्षे), चऱ्होली (४३ वर्षे) येथील रहिवासी आहेत. पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०१ स्त्री – हडपसर (४९ वर्षे) येथील रहिवासी आहे. आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. मागील २४ तासात ७ मृत्यु झालेले आहेत.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १३४५४१ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ११६१७७ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १९७३ जणांचा मृत्यू झालेला आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या अ – ३१८, ब – ३६०, क – ३०२, ड – ३५४, इ – २७६, फ – २६०, ग – २४८, ह – १५७, एकुण – १२७५.