न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ एप्रिल २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज शनिवारी (दि. ०३) रोजी २८३२ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १८५४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ११ पुरुष आकुर्डी (४४ वर्षे), निगडी (८९ वर्षे), पिंपरी (५८,८५,७६,७२,७८ वर्षे), वाल्हेकरवाडी (६० वर्षे), देहू आळंदी रोड (८४ वर्षे), चिखली (८२ वर्षे), सांगवी (५६ वर्षे) ०४ स्त्रीया या आकुर्डी (६८ वर्षे), किवळे (९५ वर्षे), काळभोर नगर (७५ वर्षे), चिंचवड (५० वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०२ स्त्री – विश्रांतवाडी (६५, ७२ वर्षे) येथील रहिवासी आहे. आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. मागील २४ तासात ७ मृत्यु झालेले आहेत.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १४७५४६ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १२४८४४ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे २०४९ जणांचा मृत्यू झालेला आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या अ – ३५६, ब – ४२३, क – ३७८, ड – ३९९, इ – ३३६, फ – ३५५, ग – २९६, ह – २८९
एकुण – २८३२.