- समाजातील वंचित महिलांना पदाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून द्यावा
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
सिंधुदुर्ग (दि. ३० डिसें.) :- सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या विविध विषय समिती सभापतिपदाच्या निवडणुका अलीकडेच पार पडल्या. अपेक्षेप्रमाणे या निवडणुकीमध्ये स्वाभिमानी पक्षाचाच बोलबाला या निमित्ताने पाहावयास मिळाला आहे.
या निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माडखोल जिल्हा परिषद मतदारसंघातून सावंतवाडी तालुक्यातील सांगेली जि. प. मतदारसंघाच्या सदस्या पल्लवी पंढरीनाथ राऊळ यांची महीला व बालकल्याण सभापतिपदी निवड झाली आहे.
यानिमित्ताने पिंपरी चिंचवड शहरातील प्राधिकरण येथील उद्योजक व दिनेश ॲडव्हरटाझिंगचे सर्वोसर्वा दिनेश लिंगवत यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या नूतन महीला व बालकल्याण सभापति पल्लवी पंढरीनाथ राऊळ यांची नुकतीच भेट घेतली व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला आहे.
याप्रसंगी दिनेश लिंगवत म्हणाले की, नारायण राणेंनी सामान्य कार्यकर्तीला पद देऊन सभापतीपदी आरूढ केले आहे. या पदाच्या निमित्ताने पल्लवीताईंच्या हातून गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे काम होवो. तसेच समाजातील वंचित महिलांना या पदाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देऊन, त्यांना सशक्त करण्याची अपेक्षा लिंगवत यांनी पल्लवीताईंकडे व्यक्त केली आहे. उत्तमोत्तम यशोशिखर संपादन करून, पक्ष नेतृत्वाने आपल्या कार्यगुणांची दखल घेत जिल्ह्याची जबाबदारी आपणाकडे द्यावी, अशा शुभेच्छा यावेळी लिंगवत यांनी व्यक्त केल्या आहेत.















