न्यूज पीसीएमसी नेटवर्क
कासारवाडी (दि. ३१ डिसें.) :- कासारवाडीमधील केशवनगर येथील गुरुनाथ कॉलनी येथे सोमवार (दि. ३१ डिसें.) रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास घरगुती सिलेंडरमधून गॅस गळती होऊन झालेल्या स्फोटामध्ये शोभा बिरादार, गणेश बिरादार, शुभम बिरादार, देवांश बिरादार, विजय जाधव अशी पाच जण जखमी झाले आहेत.
आग लागल्याची माहिती मिळाताच, संत तुकारामनगर आणि भोसरी येथील दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. तात्काळ आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. घरगुती सिलेंडरमधून गॅस गळती होऊन स्फोट झाल्याने आग लागली आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलविले असल्याचे अग्निशामक विभागाकडून कळविण्यात आले आहे.










