- ॲमेझॉन ऑनलाइन पोर्टलचा घेतला आधार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ जुलै २०२१) :- गर्भपाताची औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय बेकायदेशीरपणे ऑनलाइन माध्यमातून विकली. पडताळणीसाठी विवेक मल्हारी तापकीर यांनी ॲमेझॉन या ऑनलाइन पोर्टलद्वारे गर्भपाताची औषधे ३१ मे रोजी मागवली होती. त्यांना आरोपीच्या कंपनीची औषधे ४ जून रोजी मिळाली. तापकीर यांनी याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाचे पुण्याचे सहआयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार केली.
फिर्यादी अन्न निरीक्षक विवेक खेडकर यांनी गुजरात येथे जाऊन या प्रकरणाची चौकशी केली असता आरोपी दोषी आढळला. औषध निरीक्षक भाग्यश्री अभिराम यादव यांनी वाकड पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. ५) फिर्याद दिली आहे.
त्यानुसार RK Medicenes, A/61, parisima complete, c g road, navrangpura, ahmedabad, gujrat, 380006 या दुकानाचे चालक पिंटू कुमार प्रवीणचंद्र शहा याच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम १२० (ब) तसेच औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० अंतर्गत १८ (a) (vi), १८ (c) read with rule ६५ (३) (१), ६५ (४) (४), ६५ (६), ६५ (९) नुसार वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
















