- पिंपरी चिंचवड शहरातील पोस्टात उपलब्ध..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जुलै २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात पोस्टमनच्या माध्यमातून मोबाईल क्रमांक आधार कार्डशी जोडण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे आता आधार केंद्रांमध्ये जाण्याची आवश्यकता भासणार नाही.
पिंपरी – चिंचवड शहरात ३० पोस्ट ऑफिस असून साधारण ३५० पोस्टमन कार्यरत आहेत. त्यांच्यामार्फत मोबाईल क्रमांक आधार कार्डशी जोडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यासाठी पन्नास रुपये शुल्क घेतले जात आहे, त्याची पावतीही दिली जात आहे.
इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडिया यांनी त्यासाठी करार केला आहे, अशी माहिती पोस्टाचे जनसंपर्क अधिकारी एस. पारखी यांनी दिली.