- नगरसेविका सविता खुळे यांचा विधायक उपक्रम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जुलै २०२१) :- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रहाटणी प्रभाग क्र. २७ येथे नगरसेविका सविता बाळकृष्ण खुळे यांनी (दि. २२ जुलै) विधायक उपक्रम राबविला.
वाढदिवस व फ्लेक्सवरील अनावश्यक खर्च टाळून आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नागरिक यांना मोफत छत्री व माक्सचे वाटप केले. तसेच ॲम्बुलन्स चालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रभागातील नागरिक उपस्थित होते.