न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी दि. २९ जुलै २०२१) :- पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने संघटना अधिक मजबूत करण्यासाठी नवीन शाखांचे उदघाटन, आढावा बैठक व नवीन पदनियुक्त्या शुक्रवार (दि ३०) जुलै रोजी सिझन्स बँक्वेट हॉल, निगडी प्राधिकरण येथे सकाळी ११.३० ते ३.०० वा. होणार आहेत.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूभाई शेख व कार्याध्यक्ष रवीकांत वरपे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. शहरातील सर्व युवक व पदाधिकारी यांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी केले आहे.















