- सर्वसाधरण सभेत मंजुरी; आशा सेविकांचाही समावेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जुलै २०२१) :- महापालिकच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, महापालिका इतर रुग्णालये, दवाखाने या ठिकाणी कोरोनाच्या काळात आस्थापनेवर कायरत आणि मानधनावरील वैद्यकीय तांत्रिक संवर्गातील अधिकारी कर्मचारी यांना कोविड भत्ता देण्यात येणार आहे. १ हजार १५६ कर्मचा-यांना एप्रिल ते जून या तीन महिन्यांचा कोविड भत्ता देण्यासाठी १ कोटी ४ लाख ३५ हजार रुपये खर्च येणार आहे. या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेने मान्यता दिली आहे.
पिंपरी – चिंचवड महापालिकेची जुलै महिन्याची तहकूब सभा ऑनलाइन झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर उषा ढोरे होत्या. कोरोना काळात काम करणा – या वायसीएम रुग्णालयासह महापालिका रुग्णालय, दवाखान्यातील अधिकारी, कर्मचा- यांना स्वतंत्र कोविड भत्ता अदा करण्याबाबत वैद्यकीय कार्यालयामार्फत १९ मे रोजी आयुक्तांकडे प्रस्ताव दिला होता. कोविड काळात कार्यरत असलेल्या तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, दंतशल्य चिकित्सक स्टाफनर्स, सर्व पॅरामेडीकल स्टाफ प्रयोगशाळा सहाय्यक, वर्ग ४ मधील कर्मचा-यांना वेतनाव्यतिरिक्त स्वतंत्र कोविड भत्ता देण्यास स्थायीने १ एप्रिल रोजी मान्यता दिली होती.
यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, महापालिकेची इतर रुग्णालये आणि दवाखाने या ठिकाणी कोरोनाच्या काळात आस्थापनेवर कार्यरत असलेल्या वैद्यकीय तांत्रिक संवर्गातील अधिकारी, कर्मचारी यांना कोविड भत्ता देण्यात येणार आहे. वर्ग वरच्या कर्मचा-यांना १५ हजार रुपये, वर्ग ३ मधील कर्मचा -यांना १० हजार आणि वर्ग ४ मधील कर्मचा-यांना ५ हजार रुपये भत्ता मिळणार आहे.
कोरोना काळात मानधनावर काम करणा-या वैद्यकीय अधिकारी, लेखा व्यवस्थापक, लेखापाल, लिपीक, एएनएम, डेटाएन्ट्री आपरेटर, स्टाफनर्स, वरिष्ठ डॉटस प्लस, क्षयरोग, एचआयव्ही पर्यवक्षेक, वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक, प्रयोगशाळा पर्यवेक्षक, टीबी हेल्थ व्हिजिटर, पीपीएम कॉडीनेटर, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, बालवाडी शिक्षिका आणि आशा स्वयसेविका यांना १० हजार रुपये, मदतीनस, वाहनचालक यांना ५ हजार रुपये तीन महिन्यांसाठी कोविड भत्ता देण्यात येणार आहे. तीन महिन्याचा कोरोना भत्ता देण्यास महासभेने उपसूचनेद्वारे मान्यता दिली.
















