- भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जुलै २०२१) :- घराचे सेफ्टी डोअर व आतील लाकडी दरवाजाचे लॉक तोडून चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे दागिने असा एकूण ४ लाख ५५ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना मोशी येथील गंधर्व नगरी सोसायटीत २४ ते २७ जुलै २०२१ दरम्यान घडली.
नारायण उत्तम जाधव (वय ३३, रा. गंधर्व नगरी, मोशी) यांनी शुक्रवारी (दि. ३०) भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.