- देशी व विदेशी दारुसह साडेसह लाखांचा मुद्देमाल जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जुलै २०२१) :- मुंबई – बेंगळुरू महामार्गालगत निंबाळकर नगर, ताथवडे येथील हॉटेल कोल्हापुरी व्हेज-नॉनव्हेज येथे अवैधरित्या मद्यसाठा करून गिऱ्हाईकांना त्याची विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सामाजिक सुरक्षा पथकाने सापळा रचून शुक्रवारी हॉटेलवर छापा टाकला.
या कारवाईत एक हजार २०० रुपयांची रोकड तसेच सहा लाख ४५ हजार ७५५ रुपये किमतीच्या देशी व विदेशी दारुच्या बाटल्या अवैधरित्या साठविल्याचे मिळून आले. त्यानुसार पोलिसांनी सहा लाख ४६ हजार ९५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शुक्रवारी (दि. ३०) ही कारवाई केली.
हॉटेलचा मालक अशोक मोहनलाल चौधरी (वय ३३, रा. पवनानगर, चिंचवडगाव), हॉटेलचा मॅनेजर प्रकाश विलास गायकवाड (वय २४, रा. ताथवडे), अशी आरोपींची नावे आहेत.












