- दोन्ही विभागांकडून नागरिकांना धोरणात्मक निर्णयाची अपेक्षा..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ ऑगस्ट २०२१) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख म्हणून उपायुक्त संदीप खोत यांची नियुक्ती २४ जुलैला करण्यात आली आहे. त्यांच्याकडे आरोग्य विभागाचे प्रशासकीय व वित्तीय अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागावर पूर्णपणे त्यांचे नियंत्रण असणार हे स्पष्ट झाले आहे.
उपायुक्त खोत यांच्याकडे आरोग्य विभागाची नव्यानेच जबाबदारी दिल्याने शहरातील कचरा समस्या दूर होण्यास मदत होईल. तसेच, स्वच्छ भारत अभियानात शहराचे नाव उंचावेल, अशी अपेक्षा केली जात आहे.
तसेच, शिक्षण विभागाच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी म्हणून अतिरिक्त पदभार प्राथमिक विभागाचे सहायक प्रशासन अधिकारी पराग मुंढे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. उपायुक्त खोत यांची शिक्षण विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली आहे. त्यामुळे मुंढे यांच्याकडे सोपविण्यात आलेले अतिरिक्त पदभार काढून घेण्यात आला आहे. तसे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी आहेत.