न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ ऑगस्ट २०२१) :- कालवश विद्याधर चाबुकस्वार यांच्या १८ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त कोरोनाचे नियम पाळून रहाटणीतील क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले एजुकेशन फाऊंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
त्यांनी (दि. ११. ८. २००५) या दिवशी संस्थेचा पाय रचला होता. संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, मुख्याध्यापिका आसावरी घोडके, अशोक तांबे यांच्या उपस्थितीत त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
दरम्यान स्कूलच्या वतीने रहाटणी व पिंपळे सौदागर येथील अण्णासाहेब मगर विद्यालय व कै. भिकोबा तांबे या शाळेतील इयत्ता दहावीतील ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत घवघवीत यश मिळविले त्यांना परीक्षेचे पॅड व गुलाब फुल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक इतर शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन कळसाईत तर, आभार श्रद्धा चव्हाण यांनी मानले.