- प्रभागनिहाय वयोगट; लसीकरण केंद्र व डोसच्या संख्येसाठी वाचा ….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ ऑगस्ट २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिके मार्फत (दि. १०) प्रामुख्याने वार्डनिहाय केंद्रीय KIOSK टोकनप्रणालीव्दारे कोविड-१९ लसीकरण करण्यात येत आहे. या अनुषंगाने नागरिकांनी KIOSK मशिनव्दारे घेतलेल्या टोकननुसार आणि पिं.चिं.म.न.पा. मार्फत लसीकरणाबाबत एस.एम.एस. संदेशप्राप्त झालेल्या नागरिकांना वय १८ वर्षावरील सर्व लाभार्थींना पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या एकुण लाभार्थ्याना ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा डोस लसीकरण केंद्रावर देण्यात येईल.
वय वर्षे १८ ते ४४ साठी पहिला डोस हा १० लाभार्थी कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने व उर्वरित लाभार्थी पिं.चिं.मनपा केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली व्दारे तर दुसरा डोस हा १० लाभार्थी कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने व उर्वरित लाभार्थी पिं.चिं.मनपा केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली व्दारे देण्यात येईल.
वय वर्षे ४५ पुढील लाभार्थ्यांना पहिला डोस हा १० लाभार्थी कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने व उर्वरित लाभार्थी पिं. चिं. मनपा केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली व्दारे तर, दुसरा डोस हा १० लाभार्थी कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने व उर्वरित लाभार्थी पिं.चिं.मनपा केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली व्दारे देण्यात येईल.
दोन्ही वयोगटासाठी लसीकरण केंद्रे व डोसची संख्या….
अ प्रभाग – कै .ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल आकुर्डी -एकूण डोस-१९०, हेगडेवार जलतरण तलाव -एकूण डोस – १९०.
ब प्रभाग – पिं. चिं.मनपा. शाळा पवनानगर, काळेवाडी – एकूण- १७०, क्रांतीज्योतीसावित्रीबाई फूले (जुने तालेरा) रुग्णालय , चिंचवड. एकूण डोस – १७०.
क प्रभाग – नेहरुनगर उर्दु शाळा एकूण डोस – १४०, मासुळकर कॉलनीआय हॉस्पिटल – एकूण डोस – १४०.
ड प्रभाग – खिवंसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव – एकूण डोस – २१०, पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा, पि. निलख दवाखानाजवळ – एकूण डोस – २१०.
इ प्रभाग – नवीन भोसरी रुग्णालय – एकूण डोस – ५१०, अंकुशराव लांडगे सभागृह, भोसरी-एकूण डोस – ५१०.
फ प्रभाग – यमुनानगर रुग्णालय-एकूण डोस – १३०, स्केटिंग ग्रांऊड, सेक्टर नं.२१ यमुनानगर एकूण डोस – १३०.
ग प्रभाग – पिं. चिं.मनपा. शाळा रहाटणी – एकूण डोस – ४९०, जुने जिजामाता रुग्णालय एकूण डोस – ४९०.
ह प्रभाग – अहिल्याबाई होळकर सांगवी मनपा शाळा एकूण डोस – १३०, कासारवाडी दवाखाना – एकूण डोस – १३०.
सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण सकाळी १०.०० ते सायं.५.०० या कालावधीत करण्यात येईल. कोविन अॅपवर नोंदणी करण्यासाठी (दि. १३) सकाळी ८.०० वाजता स्लॉट बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल. “कोव्हिशील्ड” लसीचा पुरेसासाठा उपलब्ध नसल्याने दि. १३/०८/२०२१ रोजी या लसीचे लसीकरण करण्यात येणार नाही.
















