- चार सहायक आयुक्त, एक अपर आयुक्त व दोन पोलीस उपायुक्त दिमतीला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑगस्ट २०२१) :- मनुष्यबळ उपलब्ध होण्याबाबत पिंपरी – चिंचवड शहर पोलीस आयुक्तालयाने शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. त्यानुसार शासनाकडून विविध पदांना मंजुरी देण्यात आली आहे.
शहरात सध्या सहायक पोलीस आयुक्त कार्यरत असून, आणखी चार पदांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे शहर पोलीस दलातील सहायक आयुक्तांची संख्या १२ होणार आहे.
सध्या एक अपर पोलीस आयुक्तांचे पद मंजूर आहे. आणखी एक अपर पोलीस आयुक्तांचे पद मंजूर करण्यात आले आहे. तर सध्या तीन उपायुक्त कार्यरत आहेत. आणखी दोन पोलीस उपायुक्तांची पदेही नव्याने मंजूर झाली आहेत.
















