- आगामी सभेपुढे होणार सादर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑगस्ट २०२१) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेचा २०२०-२१ या वर्षाचा पर्यावरण अहवाल तयार झाला आहे. हा अहवाल महापालिका सर्वसाधारण सभेसमोर मंजुरीसाठी ठेवला आहे.
कोविडमुळे विलंब झाल्याने गतवर्षीचा (२०१९ -२०) अहवाल जानेवारी महिन्यात मंजूर झाला. त्यानंतर काही महिने पूर्ण झाल्यानंतर लगेचच दुसरा मंजुरीसाठी आला आहे. या अहवालाला देखील कोविडमुळे महिनाभराची मुदतवाढ घेण्यात आली.
महापालिकेच्या २०१९ -२० या वर्षाचा पर्यावरण अहवाल चालू वर्षी जानेवारी महिन्यात झाला. गतवर्षी कोविडमुळे लागू करण्यात लॉकडाऊन आणि त्यानंतरच्या प्रतिबंधामुळे २०१९ -२० ची आवश्यक माहिती मिळण्यास विलंब झाला. त्यानंतर सात महिन्याने २०२०-२१ या वर्षाचा अहवाल मंजुरीसाठी आला आहे. कोविडमुळे माहिती मिळण्यास विलंब झाल्याने या अहवालाला देखील महिनाभराचा विलंब झाला आहे.