- तळेगाव व मांजरीतील दोघेजण गजाआड..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ ऑगस्ट २०२१) :- चिखलीमधील घरकुल येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत व्हीआयपी कोट्यातून घर व गाळा मिळून देतो, असे रवींद्र बबन शिंदे, संतोष चव्हाण, गोरक्षनाथ गवंड, प्रविण गावडे, बबन लोंबाटे यांना सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला.
त्यांच्याकडून वेळोवेळी ७ लाख ६२ हजार रुपये घेतले. त्यांना घर व गाळा मिळवून दिला नाही. तसेच त्यासाठी घेतलेले पैसे परत केले नाही. फिर्यादी व इतरांनी अनेकदा पैशांची मागणी केल्यानंतरही ते न दिल्याने शेवटी रवींद्र बबन शिंदे (वय ३१, रा. रुपीनगर, तळवडे) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.
आबासाहेब वसंतराव भोसले (वय ४९, रा. लेक पॅराडाईज सोसायटी, तळेगाव दाभाडे), योगेश विठ्ठल ढोले (वय ३१, रा. घुलेनगर, मांजरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार धुमाळ अधिक तपास करीत आहेत.