- अजंठानगर येथे विश्वास रिक्षा स्टँडचे उद्घाटन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ ऑगस्ट २०२१) :- अजंठानगर येथे महाराष्ट्र रिक्षा पंचायत संलग्न विश्वास रिक्षा स्टँडचे महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष व कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे आणि नगरसेविका योगिता नागरगोजे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायात अध्यक्ष बाबा कांबळे, नगरसेविका योगिता नागरगोजे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत, माजी नगरसेवक विश्वास गजरमल, माजी नगरसेवक रावसाहेब सरवदे, अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा पदाधिकारी ॲड रूपवते, रमेश वाघमारे, मेजर साबळे, श्रीरंग जोगदंड, अंकुश साबळे आदी उपस्थित होते.
बाबा कांबळे म्हणाले, रिक्षा स्टँडवर पानपोई, वाचनालय असे समाजोपयोगी उपक्रम राबवले गेले पाहिजेत. नागरिकांना बसण्यासाठी बाकड्यांचीही व्यवस्था व्हावी, यासाठी महानगरपालिकेकडे प्रयत्न करणार आहे. नागरिक आणि रिक्षाचालक यांच्यात सुसंवाद वाढला पाहिजे; असे झाल्यास नागरिकांना अधिक चांगली प्रवासी सेवा देण्याचं काम रिक्षा चालक करू शकतील.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी रिक्षा स्टँडचे अध्यक्ष राम अल्कुंटे, उपाध्यक्ष विशाल सरवदे, अमर गायकवाड, दादा दाभाडे, धनंजय गवळी, उमेश गायकवाड, दिपक साबळे, बाबासाहेब सरवदे, महादेव अवसरमल, यांनी परिश्रम घेतले.