- अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ ऑगस्ट २०२१) :- जुन्या सांगवीतील लक्ष्मीनगर येथील अॅक्सीस बँकेच्या एटीएमच्या मशीनचे स्क्रीन, पत्र्याचे कव्हर, कॅशवेच्या खालील डायलरच्या बाहेरील आवरणाचा पत्रा उचकटला. डायलरच्या एका बाजूला ठोसे मारून डायलर तोडण्याचा प्रयत्न केला.
एटीएम सेंटरच्या मुख्य दरवाजाची काच व त्याबाजूची काच फोडून नुकसान केले. मात्र, आतील मुख्य दरवाजा उचकटता न आल्याने चोरट्याला मशीनमधून रोकड चोरता आली नाही. घी घटना सोमवारी (दि. १६) मध्यरात्री एकच्या सुमारास घडली.
पोलीस नाईक स्वप्नील विश्वनाथ शिंदे यांनी सांगवी पोलीसात फिर्याद दिली आहे. अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.