- गेम वाजविण्याकरिता पिस्तुल खरेदीसाठी केला होता अट्टाहास…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ ऑगस्ट २०२१) :- जुन्या सांगवीतील लक्ष्मीनगर येथील अॅक्सीस बँकेच्या एटीएम मशिन फोडीचा प्रयत्न झाला होता. ही घटना सोमवारी (दि. १६) मध्यरात्री एकच्या सुमारास घडली होती. दरम्यान या घटनेचा पोलिसांनी सुगावा लावला आहे.
पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने आरोपीला पकडण्यासाठी परिसरातील ८० ते ९० सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्हीत दिसणारा व्यक्ती संगमनगर परिसरात असून सांगवीतील एका हॉटेलसमोर थांबला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. बनाव रचून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. विशाल दत्तु कांबळे (वय-२४ रा. संगमनगर, नॅशनल स्कुल गेट नं.२०, रेल्वे लेन, जुनी सांगवी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपीकडे पोलिसांनी चौकशी केली असता मागील आठवड्यात सांगवी परिसरामध्ये ऐकमेकांकडे पाहण्याच्या कारणावरुन एका मुलाने मारहाण केली होती. त्याचा राग मनामध्ये होता. त्याचा बदला घेण्यासाठी मारहाण करणाऱ्या मुलाचा गेम वाजविण्यकरीता पिस्तुलाची आवश्यकता होती. पिस्तुल खरेदीसाठी एटीएम फोडून पेसे मिळतील असा प्लॅन केला होता, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली.