- पोलीस आयुक्तांकडून तपासासाठी एसआयटीची स्थापना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ सप्टेंबर २०२१) :- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तीन पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांच्या तपासात सुसूत्रता यावी. तपास अधिकारी कोणाच्या दबावाखाली येऊ नयेत. औंध येथील उद्योगपती नानासाहेब गायकवाड आणि गणेश गायकवाड या पिता-पुत्रावर दाखल असलेल्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी विशेष तपास पथक (एसआयटी) गुरुवारी (दि. २) स्थापन केली.
पोलीस उपआयुक्त आनंद भोईटे यांच्या नियंत्रणाखाली एसआयटी काम करणार आहे. एसआयटीमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील टोणपे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पानमंद, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख हे अधिकारी आहेत.