- सात लाखांची रोकड असलेली बॅग हिसकावली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ सप्टेंबर २०२१) :- फिर्यादीच्या कंपनीत काम करणारे दोघेजण कंपनीचे पैसे घेऊन वाल्हेकरवाडी येथून जात होते. दरम्यान, पाठीमागून दुचाकीवर आलेल्या पाच अनोळखी चोरटयांनी त्यांना अडवून मारहाण केली.
तसेच, त्यांच्या हातात सात लाख तीन हजार ६५० रुपयांची रोकड असलेली बॅग हिसकावून नेली. ही घटना बुधवारी (दि. १) सायंकाळी पावणे सातच्या सुमारास वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे घडली.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. भीमसेन वदीसिंग राजपूत (वय ३१, रा. सोनवणेवस्ती, चिखली) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.