न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ सप्टेंबर २०२१) :-पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात पीएमपीच्या बसमधून फिरण्यासाठीचा दैनिक पास आता केवळ ५० रुपयांत मिळणार आहे. पुणे शहरात दिवसभर फिरण्यासाठी दैनिक पास ४० रुपये तर पिंपरी चिंचवडमध्ये फिरण्यासाठी ४० रुपयांत दैनिक पास मिळणार आहे. मासिक पास १२०० रुपयांना मिळणार आहे.
पीएमपीच्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर महापौरांनी ही माहिती दिली. विशेष म्हणजे पीएमपी प्रवासी भाड्यात वाढ करण्याचा प्रस्ताव संचालक मंडळाने फेटाळला आहे.
गुरूवारी झालेल्या पीएमपी संचालक मंडळाच्या या बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ढोरे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, नितीन लांडगे, संचालक प्रकाश ढोरे, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवडचे आयुक्त राजेश पाटील, पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा, सहव्यवस्थापकीय संचालक चेतना केरूरे इत्यादी उपस्थित होते.