- नगरसेविका शेंडगे यांना न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ सप्टेंबर २०२१) :- पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्या शहरात सुरू असलेल्या कोणत्याही कामांत गैरव्यवहार झालेला नाही. भाजपच्या नगरसेविका आशा शेंडगे यांनी केलेले आरोप ही त्यांची व्यक्तिगत मते आहेत. त्यांनी आपल्या तक्रारी पुरावानिशी योग्य ठिकाणी मांडाव्यात, असे मनसेचे गटनेते तथा स्मार्ट सिटीचे संचालक सचिन चिखले यांनी शुक्रवारी (२४) पत्रकार परिषदेत सांगितले.
चिखले म्हणाले की, स्मार्ट सिटीतील कामांचे सर्व अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या आयुक्तांकडे आहेत. स्मार्ट सिटीच्या बैठकांना मी उपस्थित असतो. त्यामुळे निविदा प्रक्रियेत काहीही भ्रष्टाचार झालेला नाही. शेंडगे यांच्याकडे पुरावे असतील, तर त्यांनी ते सादर करावेत. त्यांनी थेट न्यायालयात दाद मागावी, असा सल्ला त्यांनी दिला.


















