- पिस्टल दाखवून दहशत माजविण्याचाही प्रयत्न; दोघांना अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ सप्टेंबर २०२१) :- निगडीतील ओटा स्कीम येथे घराच्या मागे ठेवलेल्या पाण्याच्या बॅरलवर गुरुवारी रात्री अकरा वाजताच्या दरम्यान आरोपी लघुशंका करीत असल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले.
त्यांनी आरोपींना जाब विचारला. याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादीच्या डोक्यात कोयत्याने वार केला. त्यानंतर वीट आणि सिमेंटच्या दगडाने मारून फिर्यादी यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी पिस्टल दाखवून दहशत निर्माण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
अविनाश विठ्ठल लांडगे (वय ३८, रा. ओटास्कीम, निगडी) यांनी शुक्रवारी (दि. २४) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जितेंद्र जाधव (वय २०), सातलींग सांगोळगी (वय १९, दोघे रा. ओटास्कीम, निगडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करून नोटीस देऊन सोडले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.