- भाजपा नगरसेविका अनुराधा गोरखे यांचा उपक्रम...
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑक्टोबर २०२१) :- महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने आज सर्व देशात स्वच्छता दिन साजरा केला जातो, त्याचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी आज प्रभाग क्रमांक १० मध्ये अहोरात्र काम करणाऱ्या स्वच्छता दूताचा सन्मान केला.
कोरोला काळात आपण सर्वजण घरात होतो, मात्र हे स्वच्छतादूत रोड व दररोज स्वच्छतेचा ध्यास घेऊन काम करत होते, अशा महिला बंधू-भगिनींचा सन्मान आज करण्यात आला. या प्रसंगी प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश सचिव अमित गोरखे, भाजपा संघटन सरचिटणीस अमोल थोरात व प्रभाग अध्यक्ष शर्मिला बाबत, माजी उपमहापौर तूषार हिंगे, नगरसेवक बाबू नायर, सुजित आगरकर, अजित भालेराव, शिवदास हांडे यांची उपस्थिती होती.
महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली, कार्यक्रमाच्या आयोजिका नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी प्रास्ताविक केले, सदाशिव खाडे यांनी आपले विचार मांडले, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी आभार मानले.














