- कारवाईमुळे अनधिकृत फ्लेक्सबाजीवाल्यांचे धाबे दणाणले…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ ऑक्टोबर २०२१) :- महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय परिसरात क्षेत्रीय अधिकारी रविकिरण घोडके यांच्या नेतृत्वाखाली रविवारी (दि. ३) रोजी अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली.
यावेळी थेरगाव परिसरातील काळवाडी फाटा ते संतोष मंगल कार्यालय, डांगे चौक ते वाकड पोलीस चौकी, सोळा नंबर बसस्टॉप, पवारनगर येथील रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या किरकोळ विक्रेत्यांवर आणि अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई करण्यात आली.
या कारवाईत १३० बोर्ड, सहा प्लास्टिक ट्रे, पाच प्लास्टिक स्टूल, पाच प्लास्टिक बाहुली, एक लोखंडी स्टैंड, ३२ फुटपाथ बोर्ड, दोन लोखंडी रॉड, तीन वजन काटा, खुर्ची, एक सिलिडर, तीन लोखंडी पायऱ्या, दोन हातगाडीवरील स्टील, दोन हातगाड्या, एक पंक्चर हत्यार, दोन प्लास्टिक बाटल्या, पाच डस्टर, दोन चिनीमाती भांडी, दोन जाहिरात बोर्ड जप्त करण्यात आले.